राज्यातील नागरिकांचे प्रति माह २०० युनिट पर्यंत विजेचे बिल माफ करा – आप
सिल्लोड (प्रतिनिधी) – राज्यात आपल्या नेतृत्वात कोविड-19 महामारीमुळे मागील अडीच महिन्यापासून राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद झाले आहेत, यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, फुटपाथवर बसून आपले पोट भरणारे सर्व नागरिकआर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत. काही प्रमाणात यामधील कामगार आणि शेतमजूर यांना राशन च्या माध्यमातून धान्याची मदत शासनाकडून झालेले आहे.परंतु गहू तांदूळ डाळ मिळाली म्हणजे घर चालेते असे नाही, या सोबत किराणा,बाजीपाला, दुध, दवाखाना, शाळा किंवा इतर खर्च अनिवार्य आहे.राज्यातील छोटे-मोठे सर्वच रोजगाराचे साधन बंद पडल्यामुळे राज्यातील नागरिकांच्या घरात किंवा हातात एक रुपया सुद्धा बाकी नाही. अशा परिस्थितीत विद्युत बिल, पाण्याचे बिल किंवा इतर बिले नागरिकांना आज नउद्या भरावेच लागणार आहेत. परंतु आणिखी काही महिने या आर्थिक अडचणीतून सामान्य नागरिकांना सावरणे फारच कठीण आहे. यासाठी थोडी का होईना मदत म्हणून राज्यातील ज्या नागरिकांच्या विजेची खपत महिन्याला २०० पेक्षा कमी युनिट आहे, त्या सर्व (ग्राहक) नागरिकांचे विजेचे बिल माफ करावे, ही आज आम आदमी पार्टीचीच नव्हेतर राज्यातील सर्व जनतेची मागणी आहे. दिल्लीतील श्री अरविंद केजरीवाल सरकार गेल्या दोन वर्षांपासून २०० युनिट पर्यंत वीज मोफत देता आहे. याच धर्तीवर राज्य शासनाने मोठ्या मनाने नेहमीकरिता विजेचे बिल तातडीने माफ करण्याची घोषणा करावी अन्यथा आम्हाला राज्यातील जनतेला घेवून नाईलाजास्तव रस्तावर उतरून आंदोलनाचा इशारा आम आदमी पक्षाचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष अॅड. शेख उस्मान शेख ताहेर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटनमंत्री डॉ. दत्तात्रय गोंगे, सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष महेश कुमार शंकरपल्ली, शेख मुख्तार अब्दुल सत्तार, नजीर तुराब तडवी, इस्माईल शेख सलीम, अजबराव मानकर, विशाल शेजुळ, सुनील गुळवे, मुक्तार शहा, पप्पू शहा आदींच्या स्वाक्षर्या आहेत.