*राजेश गित्ते यांनी उपोषणाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे* *पिककर्ज देण्याबरोबरच अर्ज स्वीकारण्याचे बॅंकांनी केले मान्य*
परळी (प्रतिनिधी) जिल्हाधिकार्यांनी सुचना देवुनही परळी तालुक्यातील शेतकर्यांकडुन पिककर्जासाठी येणारे अर्ज घेतले जात नसल्याने भाजपा जेष्ठ नेते राजेश गित्ते यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,सरपंच यांचे शिष्टमंडळ तहसिलदारांना भेटुन निवेदन दिले.शेतकर्यांचा हा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही तर अमरण उपोषण करण्याचा इशारा राजेश गित्ते यांनी देताच प्रशासन खडबडून जागे झाले.तहसिलदार यांनी बॅंके अधिकार्यांसोबत बैठक घेवुन हा प्रश्न निकाली काढला.यामुळे शेतकर्यांचे पिककर्जासंदर्भातील अर्ज स्विकारले जाणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. परळी तालुक्यातील जवळपास 30% शेतकर्यांना यावर्षी अद्याप पिककर्ज मिळाले नाही.शेतकर्यांची ही मागणी लावुन धरत भाजपा जेष्ठ नेते राजेश गित्ते यांनी अधिकार्यांशी बोलुन निवेदन देवुन ही मागणी मांडली होती.दि.21 रोजी तालुक्यातील शेतकरी,सरपंच व ज्येष्ठांना सोबत घेवुन तहसिलदार विपीन पाटिल यांना निवेदन देत चर्चा केली व शेतकर्यांची ही मान्य झाली नाही तर माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे व खा डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.गित्ते यांनी उपोषणाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले.तहसिलदार विपीन पाटिल यांनी आज दि.22 रोजी शहरातील बॅंक अधिकार्यांसोबत बैठक घेवुन हा प्रश्न मिटविला.बॅंक अधिकार्यांनी अर्ज स्वीकारुन पिककर्ज वाटपाची हमी घेतल्याने हा प्रश्न तुर्तास मिटला. जिल्हाधिकार्यांनी सुचना देवुनही पिककर्जाचे अर्ज न घेणार्या बॅंका अर्ज स्विकारण्यास तयार झाल्याने गित्ते यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकर्यांची मोठी मागणी मान्य झाली असुन शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. @@@@@@@ शेतकर्यांच्या इतर मागण्यांचा पाठपुरावा करणार – राजेश गित्ते पिककर्जापासुन वंचित राहिलेल्या परळी तालुक्यातील शेतकर्यांचे अर्ज स्विकारण्याची मागणी मान्य झाली असली तरी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप सुरु झाले नाहीत.हे पंचनामे त्वरीत करावेत व प्रतिएकर 25 हजार रु.मदत द्यावी या व इतर मागण्यांसाठी पाठपुरावा करणार व प्रसंगी तीव्र आंदोलन करणार असल्याचे भाजपा जेष्ठ नेते राजेश गित्ते यांनी सांगितले.