युवकांनी राजकारणाकडे ना वळता उद्योग व्यवसायाकडे वळावे-दत्ता वाकसे

बीड-प्रतिनिधी आज मितिला पाहिलं तर राजकीय शेताकडे खूप मोठ्या प्रमाणात युवकांचा ओढा वाढत आहे परंतु युवकांनी क्षेत्राकडे ना वळता उद्योग क्षेत्राकडे व उद्योग व्यवसायाकडे वळावे त्यामुळे कौटुंबिक आणि मानसिक हानी होणार नाही असे उदगार धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केले आहे वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील शुभम त्यांनी सेंटरचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते पुढे म्हणाले की आज पाहिले तर राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वातावरण दूषित झालेले आहे त्यामुळे आगामी काळात युवकांनी राजकारणात येण्याचा मानस करू नये आज पाहिले तर राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे असले तरच राजकारणामध्ये तो नेता टिकला जातो त्यामुळे युवकांनी आता उद्योगी क्षेत्राकडे उद्योग व्यवसायाकडे वळून आपले अस्तित्व निर्माण करावे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक साथ आणि त्यामुळे आगामी काळात युवकांना राजकारणात न पडता क्षेत्रात उतरावे असे देखील बोलताना ते म्हणाले यावेळी उद्घाटन प्रसंगी उपस्थित जनता पार्टी युवा मोर्चा तालुका प्रमुख ईश्वर भाऊ तांबडे, सुतार संघटनेचे नेते बाबुराव तावरे,सुरेश दोडताले, राजेभाऊ नेटके, शुभम चायनीजचे मालक जयद्रत धायतिडक, सखाराम नानवर, गणेश आंबुरे, बळीराम नानवर, अशोक तांबडे, यांच्यासह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *