यावल प्रिंप्री तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंच रामनाथ पवार तर उपसरपंच पदी विजय राठोड यांची बिनविरोध निवड
घनसावंगी (प्रतिनिधी) कैलास पवार
घनसावंगी तालुक्यातील यावल प्रिप्रीं तांडा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेनेचे रामनाथ पवार व उपसरपंच पदी विजय छबुराव राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावल प्रिंप्री तांडा ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत पॅनल “जय भवानी जय सेवालाल ग्रामविकास पॅनल ” चे प्रमुख छबुराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाल्याने रामनाथ पवार यांना स्पष्ट बहुमत मिळाले सरपंच व उपसरपंच पदी निवडणुक गुरुवारी घेण्यात आली. सरपंच पदासाठी रामनाथ पवार व उपसरपंच पदासाठी विजय छबुराव राठोड यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सरपंच व उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आली.
अध्यासी अधिकारी म्हणुन एस टी साळवे यांनी काम पाहिले तसेच व्ही एस शिंदे ग्राम विकास अधिकारी बाबुराव राठोड यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच यांचे ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करण्यात आले .सरपंच व उपसरपंच यांची निवड झाल्यानंतर गावातुन मिरवणुक काढण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सुदाम पवार, विजय बाबुराव राठोड, शानु रामनाथ पवार ,सरुबाई शेषेराव पवार ,ललिता निवृत्ती चव्हाण,मिराबाई कन्नु चव्हाण,यमुनाबाई सिताराम पवार, बाबुराव राठोड गोपिचंद राठोड, अर्जुन पवार छबुराव राठोड ,अंकुश पवार ,कैलास पवार ,विजय पवार ,राजेश सखाराम चव्हाण, गणेश प्रभु राठोड ,यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले निवडणूकी दरम्यान पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार देशमाने यांनी बंदोबस्त ठेवला होता.
