यावलपिंप्री व पांगरा येथे कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट

रांजणी (प्रतिनिधी) – घनसावंगी तालुक्यातील यावलपिंप्री व पांगरा येथील रुग्णांची रिपोर्ट कोरोना पाॅजिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 33 जणांना कोरंटाईन करण्यात आले असून यामध्ये तीन खाजगी डाॅक्टरांचा समावेश असल्याचे समजते.घनसावंगी तालुक्यातील यावलपिंप्री येथील एक पुरुष व पांगरा येथील एका महिलेची रिपोर्ट पाॅजिटिव्ह आल्याची माहिती समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले असून तहसीलदार नरेंद्र देशमुख, पोलिस निरिक्षक शिवाजी बंटेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नागेश सावरगावकर, माजी उपसभापती नानाभाऊ उगले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल ठाकुर, आरोग्य सेवक रितेश तौर यांनी तातडीने यावलपिंप्री व पांगरा येथे भेट दिली. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आल्याने 33 जणांना कोरंटाईन करण्यात येणार असून यामध्ये रांजणी येथील तीन खाजगी डाॅक्टरांचा समावेश असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *