मोमीन सिराज व शेख जकी इमाम यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान..!

बीड : कोरोना पार्श्वभूमीवर सगळा देश लॉकडाऊन असतानां. ज्या कोरोना योद्धांनी आपले जीव धोक्यात घालून मदत कार्य केले आहे आपले कर्तव्य पार पाडले आणि सातत्यानं पार पाडत आहेत अश्या कोरोना योध्दाचा मौलाना आजाद सेवाभावी संस्थेकडून गौरव करण्यात येत आहे .
संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव भारतामध्ये सुद्धा दिसून येत होता त्यातच महाराष्ट्रामध्ये कोरोना ने जास्तच थैमान घातले होते कोरोणा व्हायरसचे संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण लॉकडाउन पुकारले होते या बंदमुळे मोलमजुरी करणारे गरीब कष्टकरी हातावर पोट भरणारे व अपंग विधवा मूकबधिर व वयोवुद्ध त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती ज्या नागरिकांचे हातावर पोट होते अशा नागरिकांना आर्थिक दुर्बल घटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता त्यांच्यासाठी बीड दैनिक जगमित्र परिवाराच्या माध्यमातून रोज संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये मोमीन सीराज व शेख जकी इमाम ( बबलू )यांचा मोलाचा वाटा होता दैनिक जगमित्र परिवाराच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत या दोघांना मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अॕड सय्यद अजीम व सचिव अॕड.सय्यद मिन्हाजोद्दीन यांच्या तर्फे कोरोणा योद्धा प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले
कोविड योद्धा म्हणून सन्मान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *