मुस्लिम आरक्षण “एक युवक,एक पोस्टकार्ड” अभियान अंतर्गत सैकड़ों पोस्टकार्ड परळीतुन मुख्यमंत्री कड़े रवाना!
परळी : सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र हे “एक युवक,एक पोस्टकार्ड” मोहीम ची सुरवात आज गुरुवार,17 जून 2021 रोजी पासुन करत आहे. टपाल पेटीचा माध्यमातून मुख्यमंत्री कार्यलयला टपाल पाठवणार आहे. आज परळी येथे १५० च्यावर पोस्टकार्ड पाठविण्यात आले.
गेल्या अनेक वर्षे मार्गी ना लागलेल्या मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आता जोर धरत असुन मराठा समाजासोबत मुस्लिम युवक ही आपल्या अधिकारासाठी आक्रमक होत असुन संवैधानिक मार्गाने लढा देत आहेत व याचेच एक भाग म्हणून सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र या युवक चळवळी च्या आवाहनावर राज्यभरातुन मुख्यमंत्री यांना एक युवक एक पोस्टकार्ड पाठवणार आहे.
सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र चे प्रमुख मागण्या:-
१)मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा.
२)मॉबलिंचिंग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा,मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा.
३)प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे.
४)बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी,एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी.
५)मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी.
६)राज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच बळकटीकरण करण्यात यावं.वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.
हे मागण्या लवकरत लवकर पुर्ण करून यावा
आज या कार्यक्रमात शेख अख्तर, नगर सेवक केशव गायकवाड़, शेख मुदस्सिर, शेख जहीर, फेरोज खान(जनाब), अशफाक शेख (नय्यर), अब्बास सय्यद, व परळीतील सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र चे कार्यकर्ता उपस्थित होते