मुलचंद जिनिंगला आग,मोठ्या प्रमाणात कापुस जळुन खाक
जालना/प्रतिनिधी जालना औद्योगिक वसाहतीत असलेल्या मुलचंद फुलचंद कृषी उद्योग या जिंनिंग ला काल मध्य राञी लागलेल्या आगित मोठ्या प्रमाणात कापुस जळुन खाक झाल्याची प्राथमिक माहीती आहे. माञ जिनिंग वाल्याकडुन अशी कुठली ही आग लागली नसल्याचे सांगुन या आग प्रकरणावर पडदा टाकत असल्याने संशय निर्माण होत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये ञिमुर्ती चौक परिसरात असलेल्या मुलचंद फुलचंद या कापुस जिनिंग ला काल बुधवारी राञी उशिरा आग लागुन मोठ्या प्रमाणात कापुस जळाला,आग लागल्याची माहीती अग्निशामक दलाला देवुन पाण्याचे बंब लागलीच पोहचले,माञ तो पर्यंत आग जिनिंग वाल्यांनी विझवल्याची माहीती अग्निशामक दलाचे कर्मचार्यांनी दिली.माञ असे असतांना देखील कंपनी वाल्याकडुन आमच्याकडे कुठल्याच प्रकारची आग लागली नसल्याचे सांगुन या जळीत प्रकरणावर पडदा टाकु पाहत असल्याने या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.