*मुख्यमंत्री यांनी केले लुखेगाव च्या सरपंच चे कौतुक या मुळे माजलगाव तालुक्यातील लुखेगाव राज्यात चमकले* सरपंच व ग्रामसेवक चे नियोजनबद्ध काम ग्रामस्थाची साथ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बीड जिल्ह्यातील महिला सरपंच पठाण हजेराबी कडेखाँ यांचा थेट संवाद*

माजलगाव प्रतीनीधी (पठाण वाजेदखॉन ) कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशातील सर्व ग्रामीण भागात मृत्यू वाढत असताना देखील माजलगाव पासून सहा किलोमीटरवर असलेल्या लुखेगावातील ग्रामस्थ निर्धास्तपणे झोपू शकत होते. गावातील कोरोना रक्षक समितीने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये गावात एकही रुग्ण आढळला नाही आणि एकही मृत्यू झाला नाही. गावच्या या कामगिरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची मोहर उमटवली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी आज राज्यातील नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद ( मराठवाडा )विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यात ‘कोरोना मुक्त गाव’ मोहीम प्रभावीपणे राबवित असलेल्या सरपंचांच्या कामाची माहिती घेतली. यावेळी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लुखेगावच्या सरपंच पठाण हजेराबी कडेखाँ यांच्याशी संवादाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी लुखेगावाचे, सरपंचासह ग्रामस्थांचे त्यांच्या यशस्वी प्रयत्नांबद्दल कौतुक केले. सरपंच श्रीमती पठाण हजिराबी म्हणाल्या, कोरोना रक्षक समिती तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य , गावातील कार्यरत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदींचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायत यंत्रणेद्वारे गावातील लोकांना लसीकरण मोहीम, बाधित होऊ नये यासाठी नागरिकांनी घ्यायची काळजी, बाधितांबाबत उपाय योजना, इतर गावांमध्ये गेल्यानंतर घ्यायची खबरदारी याबाबत माहिती दिली. कोरोना संसर्गाची साथ आल्यापासून गावचे कारभारी सतर्क झाले होते, या “कोरोना”ला गावात शिरू द्यायचे नाही असा पक्का निर्धार करून उपाय योजना सुरु करण्यात आल्या.जवळपास 90 टक्के मुस्लिम समाजाचे नागरिक असून त्यांनी धार्मिक स्थळ बंद करणे रमजान -बकरी ईद सारखे मोठे सण घराबाहेर न पडता साजरे करणे. यासाठी कोरोना रक्षक समितीला सहकार्य केले. बाहेरील एकही रुग्ण गावात येणार नाही याची दक्षता घेतानाच प्रतिबंध यांच्या काळात येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवण्याचा नियम कसोशीने पाळला गेला. यासाठी येणारा रस्ता बंद करून त्यावर निगराणी ठेवण्यात आली. लग्न कार्यासारखे मंगल प्रसंग देखील साजरे करण्याचे नाही यावर गावाचे एकमत झाले आणि यामुळेच ठरलेले लग्न देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉलिंग द्वारे करण्यात आले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा परिषदेसह प्रशासकीय यंत्रणांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले जिल्हा परिषद , पंचायत समिती , आरोग्य विभाग अशा जिल्हा प्रशासनाच्या वतीने लागू केलेले नियम आणि उपाय योजना यावर अंमलबजावणी केली गेली. गाव करत असलेल्या उपाययोजनांना पाठबळ देण्याचे काम शासन यंत्रणांनी केले याचा फायदा गावाला कोरोना साथीमध्ये पूर्ण सुरक्षित राखण्यात झाला ना एखादा व्यक्ती बाधित झाला ना एकही मृत्यू कोरोनामुळे झाला. आज मुख्यमंत्री महोदयांच्या झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स साठी जिल्ह्यातील विविध गावातील सरपंच देखील पंचायत समिती कार्यालय अथवा ग्रामपंचायत कार्यालयातून हजर होते. मुख्यमंत्र्यांचे विचार ऐकून या कोरोना च्या लढ्यात उत्साह संचारला अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. …आणि लुखेगाव चमकले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील 19 जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद साधला आणि कोविड संदर्भात ते करीत असलेल्या उपाय योजना जाणून घेतल्या. त्यावेळी लुखेगावच्या उपाय योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार,मुख्य सचिव सीताराम कुंटे, हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे( व्हिडिओ कॉन्फरन्स) आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी या गावचे सरपंच पांडुरंग नागरगोजे आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होईल यासाठी आणि कोरोनासह म्युकरमायकोसिसचे आव्हान आपल्यासमोर आले आहे. सर्व सरपंचांनी पुढाकार घेऊन आपले गाव कोरोनामुक्त राखावे, असे सांगितले. लुखेगावच्या यशाचे टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या प्रोत्साहनामुळे श्रीमती पठाण हजिराबी यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड हे मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे( व्हिडिओ कॉन्फरन्स) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, लुखेगावचे ग्रामसेवक महेश गेंदले यासह विविध अधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *