LatestNewsबीड जिल्हा

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची चाळण कोट्यवधी रुपयांचा निधी खड्यात!

आष्टी : केंद्रशासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर युती सरकारने ग्रामीण भागातील रस्ते शहरांना जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करून या निधीतुन तयार झालेले रस्ते निकृष्ट दर्जाचे केल्याने पोखरी ते क-हेवाडी ५.५ कि. मी. रस्त्यांचे काम होऊन दोन वर्ष झाले असून पहिल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते.दै. रिपोर्टर नागरिकांची समस्या लक्षात घेऊन बातमी प्रकाशित होताच खड्डे बुजवण्यात आले.परंतु या ही वर्षी रस्त्यांवरती जागोजागी खड्डे पडले आहेत.अधिकारी व गुत्तेदार यांनी संगनमताने निधी हडपल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने दरवर्षीच खड्डेच खड्डे पडून रस्त्याची चाळण होते आहे.

तालुक्यात विकासासाठी माजी.आ.भीमराव धोंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून रस्त्यांचे कामे पूर्ण केली हा निधी शासन स्तरावरुन मंजुर झाला असला तरी सदरील निधीमध्ये करण्यात आलेली कामे अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाली आहेत.तालुक्यातील क-हेवडगांव ते क-हेवाडी हा रस्त्या २ कोटी ५८ लाख ३६ हजार रुपये खर्च करून काम करण्यात आले आहे.पहिल्याच वर्षी रस्ता खचल्याने खड्डे पडले होते.मात्र दै.रिपोर्टरने दखल घेऊन बातमी प्रकाशित करताच खड्डे बुजवण्यात आले याही वर्षी रस्ता खचला असल्याने अधिकारी व गुत्तेदार यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याने या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असे ग्रामस्थात बोलले जात आहे.वेळीच दखल न घेतल्याने या रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीचा गैरवापर झाल्याने रस्ता एक वर्षाच्या आत खड्डेच खड्डे पडले होते.रस्ता खचला होता.याही वर्षी रस्तावर खड्डे पडल्याने चाळण झाली आहे.असे अनेक रस्ते बनले आहेत. अधिकारी व गुत्तेदारांच्या संगनमताने केवळ निधी हडपण्याचे काम केले जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन ग्रामिण भागातील जनतेचा आदर म्हणुन वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन हे खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे आहे.

चौकट

पोखरी ते क-हेवाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रूपये खर्चुन रस्त्याचे काम झाले आहे ,मात्र केलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. मात्र या कामावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे भ्रष्टाचारही झाला आहे.पोखरी ते क-हेवाडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने दरवर्षीच रस्ता खचून खड्डेच खड्डे पडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *