मुंबई येथून परभणीत जिल्हात आलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह…!
परभणी : मुंबई येथील अर्थ रोड जेलमध्ये गार्ड म्हणून पोलीस कर्मचारी कार्यरत असलेले हे मूळचे जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचे रहिवासी आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्या परिवाराला घेऊन गावाकडे निघाले जिंतूरला आल्यानंतर त्यानि आपली व पत्नी आणि दोन मुलांची तपासणी करून घेतली तपासणी अहवाल येईपर्यंत त्या कुटुंबाला डॉक्टरांनी कोरंटाईन केले होते गुरुवारी रात्री त्यांचा रिपोर्ट आला या रिपोर्टमध्ये पोलीस कर्मचारी हा निगेटिव निघाला पण त्याची पत्नी व दोन मुले हे पॉझिटिव्ह निघाले परभणी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने जिल्ह्याला मोकळा श्वास घेता येऊ लागला आता कुठे शिथिलता मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु मुंबईहून आलेले हे तिघे जण पॉझिटिव निघाल्याने जिल्हा परत ऑरेंज झोनमध्ये गेला आहे आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली व यास प्रशासनाने दुजोरा दिला आहे तसेच 14 मे ते 16 मे 2020 पर्यंत शेवडी ता जिंतूर हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे येथे 3 दिवस कठोर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.