Uncategorized

मुंबई, परळी पाठोपाठ धनंजय मुंडेंचा बीडमध्येही ‘जनता दरबार’! विविध संघटना, शिष्टमंडळे तसेच हजारो नागरिकांनी मांडल्या व्यथा भरवला!

बीड (दि. १७) —- : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेनुसार ना. धनंजय मुंडे यांनी मुंबईत भरणारा जनता दरबार मुंबई, परळी पाठोपाठ आता बीड मध्येही भरवला आहे! राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड येथे असल्यामुळे दर गुरुवारी मुंबईत भरणारा त्यांचा जनता दरबार होऊ शकला नाही, मात्र बुधवार आणि गुरुवार असे दोन्हीही दिवस ना. मुंडेंनी बीड येथील शासकीय विश्राम गृहात जनता दरबार घेत हजारो नागरिकांच्या भेटी घेतल्या. बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तसेच आज (गुरुवारी) सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत ना. मुंडे यांनी अनेक संघटनांचे पदाधिकारी, ऊसतोड कामगार – मुकादम संघटना, विविध शिष्टमंडळे यांसह हजारो नागरिकांची या दरबारात भेट घेऊन त्यांची निवेदने, मागण्या, अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या नेहमीच्या शैलीत अनेक प्रश्नांचे फोनवरून किंवा संबंधितास पत्र देऊन जागच्या जागीच समाधान केले. ना. धनंजय मुंडे यांनी याअगोदर परळी या त्यांच्या मतदारसंघात अनेकवेळा जनता दरबार उपक्रम घेऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मागील सहा महिन्यांच्या काळात कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्यक्ष भेटींना निर्बंध आले होते, मात्र आता अनलॉक च्या टप्प्यात दस्तुरखुद्द पवार साहेबांनीच सोशल डिस्टनसिंगचे पालन करत जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांना थेट मंत्र्यांकडे व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्णय घेतला. धनंजय मुंडे यांच्या जनता दरबार उपक्रमास मुंबई, परळी नंतर आता बीड मध्येही मोठा प्रतिसाद मिळाला असून, पुढील जनता दरबाराच्या वेळी नागरिकांनी भेटायला येताना सोशल डिस्टनसिंगसह कोविड विषयक अन्य नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे. लोक भेटतील तिथे जनता दरबार! दरम्यान धनंजय मुंडे आज सकाळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मारकास अभिवादन करून निघाल्यानंतर त्यांना भेटलेल्या वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांच्या शिष्टमंडळाचे रस्त्यावरच भेटून समाधान केले, त्याचप्रमाणे ध्वजारोहण करून येत असताना भेटलेल्या महिला शिक्षकांच्या शिष्टमंडळाचेही रस्त्यावरच निवेदन स्वीकारले. मराठा क्रांती मोर्चा धरणे आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी निवेदन स्वीकारले व आंदोलकांशी चर्चा केली, असे करत धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये लोक भेटतील तिथे जनता दरबार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *