मुंडे भगिनींची 20 कोटी रुपयाची पुण्याई कामाला आली ..अन् अंबाजोगाई शहरातील प्रमुख रस्ते कोरोना संकटात झाले खड्डे मुक्त
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे नेतृत्व करताना मुंडे भगिनींनी ,सत्तेच्या काळात केलेली विकासाची पुण्याई सत्तांतरानंतरही कशाप्रकारे विकासाला पुढे घेऊन जाते, याचे उदाहरण सध्या अंबाजोगाई करांना ‘याची देही, याची डोळा’ दिसत आहे. पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना पंकजाताई नी दूरदृष्टी ठेवून अनेक विकास कामाला चालना दिली .विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रीय महामार्ग निधीकडून अंबाजोगाई शहरातील रस्ते खड्डे मुक्त व्हावे, यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन ठेवला होता, कोरोनाच्या संकटात सदरील काम पूर्ण झाले असून ,अनेक वर्षानंतर अंबाजोगाई शहर हे आता खऱ्या अर्थाने खड्डेमुक्त झालं. दरम्यान, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केज विधानसभा मतदार संघाच्या आ , सौ नमिता ताई अक्षय मुंदडा यांनी मुंडे भगिनी चे आभार मानून कौतुक केल आहे,
पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचा कारभार करताना भाजपा नेत्या पंकजा ताईंना कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विकासाची गंगा सर्वदूर शहर आणि खेड्यापर्यंत येऊन पोहोचवली, जास्तीत जास्त विकास निधी आणून विकासाची महाचळवळ या जिल्ह्यात उभा केली, जवळपास अकरा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यांमधून घालवले ,त्याचं संपूर्ण श्रेय पंकजाताई आणि खासदार डॉ, प्रीतम ताई मुंडे भगिनींना आहे, आज जिल्ह्यात दळणवळण ज्या सुधारणा झाल्या त्या केवळ याच भगिनीमुळे. कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू डोळ्या समोर न ठेवता केवळ विकास केला पाहिजे ,आणि सर्वसामान्य जनतेच कल्याण केलं पाहिजे, ही भूमिका सतत पंकजाताईंनी घेतली, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर खासदार डाॅ प्रितमताई मुंडे आणि त्यांनी शहरातून जाणार्या प्रमुख रस्त्यासाठी जवळपास सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय महामार्ग अर्थात केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडून मंजूर करून आणला होता, ज्यामध्ये संत भगवान बाबा चौक ,शिवाजी चौक ,स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय ,चनई मार्गे उमरी फाटा ,आणि उमरी फाटा ते लोखंडी सावरगाव फाटा, या रस्त्याचा समावेश होता ,वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई येथील रस्ते कधीच खड्डेमुक्त झालेले दिसले नाही, मात्र योगेश्वरी देवीच्या वास्तव्य असलेल्या गावात चांगले रस्ते असावे अशा प्रकारची धारणा मुंडे भगिनी ची होती, त्यासाठी एवढा मोठा निधी मंजूर करून आणला, याच निधीतून आज शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त झाल्याचं नागरिकांच्या निदर्शनास येत आहे, खरं म्हणजे 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणणे फार सोप असत असे नव्हे, यासाठी खा , डॉ . सौ प्रितम ताई यांनी कठोर परिश्रम घेतले , कदाचित काम मंजूर केले नसते तर अशाप्रकारे रस्ते कधीच तयार झाले असते हे का ,?नाही याबाबत शंका ?पण मुंडे भगिनी ची पुण्याई अखेर कोरोना संकटात कामाला आली ,आणि अंबाजोगाई शहर खड्डेमुक्त झालं .त्यामुळे संपूर्ण शहरातून मुंडे भगिनी कौतुक होत आहे ,दरम्यान आ. नमिता ताई मुंदडा यांनी चांगले रस्ते केल्याबद्दल पंकजाताई आणि खासदार प्रीतम ताई यांचे आभार मानले आहेत , शिवाजी चौक ते यशवंत राव चौका साठी निधी मंजूर असून त्याच काम सुरूवात होणार असल्याचे कळते