मा. पंकजाताई मुंडे व खा. प्रितमताई यांच्या आवाहनाला साथ देत परळीतील भाजप कार्यकर्त्यांनी केले तब्बल १००० मास्क वाटप…!

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त राबवला अभिनव उपक्रम

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे व मा. खा. प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गड येथे गर्दी च्या कारणाने गोपीनाथगड येथे न जमता लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोरगरीब व वंचितांच्यासाठी जगण्याच्या व त्यांच्यासाठी संघर्ष करण्याचा वारसा पुढे न्यावा व आपआपल्या पध्दतीने लोकउपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला साद घालत परळीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने परळी शहरातील विविध ठिकाणी जाऊन सामाजिक अंतर पाळत घरणीकर रोड,किराणा दुकान लाईन व मोंढा परिसरात नगरसेवक प्रा.पवन मुंडे, भाजपयुमोचे प्रदेश चिटणीस अरुण पाठक, शहर संघटक योगेश पांडकर, गोविंद चौरे, शाम गित्ते यांनी 1000 मास्कचे वाटप केले यावेळी प्रा.पवन मुंडे,अरुण पाठक, योगेश पांडकर,प्रल्हाद सुरवसे पाटील, नरसिंग सिरसाट, गोविंद चौरे, वैजनाथ रेकने, केशव मुंडे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *