माहेरी का गेलीस म्हणून पतीने केला पत्नीचा खून!
नेकनूर : नवरा-बायकोच्या शिल्लक कुरबुरी मधून बायको माहेरी गेल्याचा राग मनात धरून नवऱ्याने बायकोच्या माहेरी जाऊन तिथे तिचा खून केल्याची घटना काल दिनांक 10 रोजी दुपारी 3 च्या आसपास बीड तालुक्यातील बोरखेड या ठिकाणी घडली. मयत महिलेचे नाव नगीना शहाजी काळे असे आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बोरखेडी येथील नगीना हिचा विवाह हंगेवाडी तालुका भूम येथील शहाजी काळे यांच्या सोबत झाला होता. मागील काही दिवसापूर्वी या दोघा नवरा बायको मध्ये काही क्षुल्लक कारणामुळे कुरबुर झाल्याने नगिना ही तिच्या माहेरी म्हणजे बोरखेड या ठिकाणी आली होती. हाच राग मनात धरून शहाजी काळे त्याच्या पत्नीच्या माहेरी गेला व त्या ठिकाणी स्वतःच्या पत्नीसोबत भांडण करून याच भांडणा मधून तिच्या छातीवर चाकूने वार केल्यानंतर निघून गेला. त्या नंतर त्या महिलेस नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात आणण्यात आले. परंतु डॉक्टरांकडून तिला मयत घोषित करण्यात आल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी नेकनूर पोलीस स्टेशन गाठले. व मयत महिलेची आई राणी बाबुशा पवार वय 45 वर्ष राहणार बोरखेड तालुका बीड हिच्या फिर्यादीवरून आरोपी शहाजी 76 काळे राहणार हंगेवाडी तालुका भूम याच्याविरोधात नेकनूर पोलिसात कलम 302, 504, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार असून त्याचा तपास नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केंद्रे हे करत आहेत.