मास्कचा वापर न केल्या प्रकरणी ११ लाखाचा दंड वसूल ; शहर वाहतूक पोलिसांची कार्यवाही..!

शेख इस्माईल नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आसताना देखील मास्कचा वापर न करणाऱ्या तब्बल अडीच हजार जणांवर नांदेड शहर वाहतूक शाखेने कार्यवाही करत सुमारे ११ लाखाचा दंड वसूल केला आहे.

मास्कचा वापर न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व त्यांचे कर्मचारी ३ जून पासून कार्यवाहीस सुरवात केली आहे. केवळ तीन दिवसात मास्क न वापरणाऱ्या दोन हजार तीनशे जणांवर कार्यवाही करून १० लाखाचा आणि सीसीटीव्हीच्या आधारे दिडशे जणांवर कार्यवाही करत एक लाखाचा असे एकूण ११ लाखाचा दंड वसूल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *