माळशेंद्रा येथे मोफत तपासणी शिबीरात 180 ग्रामस्थांची तपासणी

जालना (प्रतिनिधी) – सिंधी समाज जालना व वंचित बहुजन आघाडीतर्फे माळशेंद्रा (ता.जाालना) येथे शुक्रवारी (दि.15) सकाळी 9 ते दुपारी 2 वाजपर्यंत घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात गावातील 180 आरोग्य तपासणी करण्यात येवून, त्यांना औषधी देण्यात आल्या.माळशेंद्रा येथे  सरपंच स्वाती लहाने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने, ग्रामसेवक संजय पाजगे यांनी जालना येथून आलेल्या डॉक्टरच्या टीमचे पुष्पवृष्टी करून, गावात स्वागत केले. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात झालेल्या आरोग्य तपासणी शिबीरात डॉ. विजय सेनानी, डॉ. काळे यांनी गावातील ग्रामस्थांची तपासणी केली. व त्यांना औषधी दिल्या. कोरोनासदृश सर्दी, ताप,खोकला आदि लक्षणे असल्यास तात्काळ तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जालना येथील  सुखदेव बजाज यांच्यासह उपसरपंच रामअप्पा काटकर, सुनिल जाधव, सुभाष लहाने, त्र्यंबक बोडखे, साहेबराव लहाने, नारायण जाधव, सखाराम घुले, प्रभु लोखंडे, साळुबा लोखंडे, पांडुरंग लोखंडे, राजु लहाने, गजानन जाधव, डॉ. जाधव आदिंसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात दर आठवड्याला शिबीर – विजय लहाने

कोरोना-19 संसर्ग रोगाच्या पार्श्‍वभुमीवर माळशेंद्रा येथे यापुढे दर आठवड्याला आरोग्य शिबीर घेणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे  विजय लहाने यांनी सांगितले. तसेच  बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना गावाबाहेर क्कारटाइंन करण्यात येत असून, त्यांच्या जेवनाची व राहण्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून संरक्षण शक्य आहे. परंतु जर एखाद्यास त्याचा संसर्ग झाला तर त्यावर अद्याप तरी लस उपलब्ध नाही. त्यामुळे उपचार होऊ शकत नाही. म्हणूनच प्रतिबंध करणे हा एक उत्तम मार्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *