मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांचा कांदा तसाच चाळीत पडुन – शेळके
गंगापूर (प्रतिनिधी) – गेली तीन महिने मार्केट बंद असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. पुढील पीक उभे करण्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून शेजारील जिल्ह्यात नाफेड च्या माध्यमातून कांदा खरेदी केला जात असून.गंगापूर तालुक्यातील शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कांदा पडून आहे.नाफेड मार्फत खरेदी करून सरकार ने निर्णयात करावी जेणेकरून शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर पुढील पीक उभे करता येईल.गंगापूर तालुक्यतील सोलेगाव, ढोरेगाव, अगरवाडगाव, भिवधानोरा, गळणीब, पखोरा,भेंडळा, कायगाव,अमळनेर, लखमपूर,गणेशवाडी,जामगाव,बगडी,कानडगाव,ममदापुर, नेवरगाव, हैबतपुर,सावखेडा, मांगेवाग,वझर,पुरी, कोडापूर,शेंदूरवाधा सह गोदावरी पट्यात महाराष्ट्रात फेमस असा दर्जेदार हजारो क्विंटल कांदा मार्केट अभावी पडून आहे. सरकार च्या निकषानुसार बाजार चालू जरी झाले तरी शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळेलच असं नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र चालू करावे अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके पाटील यांनी केली आहे.सेजारारील जिल्ह्यात नगर जिल्ह्यातील जामखेड तर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये नाफेड मार्फत 900 ते 1000 रु कांदा खरेदी चालू असून औरंगाबाद जिल्हा मात्र वनवासी आहे. नगर जिल्ह्यातील व्यापारी 500 ते 600 रु कांदा खरेदी करत असून शेतकरी मात्र भरडून निघत असतांना जिल्ह्यातील कृषी प्रशासन झोपेचं सोंग घेऊन गंमत पाहत आहे.आज शेतकऱ्यांकडे ना सरकार चे लक्ष आहे ना प्रशासनाचे असा नाराजी चा सूर मराठवाड्यातील जिल्ह्यात उमटत आहे.जिल्ह्यात अजून पर्यत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोठे कांदा मार्केट उपलब्ध नसल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र नगर नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक केली जात आहे.तालुक्यात किमान 2 हजार हेक्टर वर कांदा लागवड असून पिकाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केला आहे. पुढे पावसाचे दिवस असल्याने कांदा लवकरात लवकर ग्राहकापर्यंत गेल्यास उपयुक्त व्होऊ शकतो नसता शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान व्होउन शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडेल.