मातीच मोल राखणारा नेता : शिवाजी दादा बोबडे
राजकारण घाण असतं त्यात जायचं नसतं, असं नेहमी आपल्याला घरचे बाहेरचे सांगत असतात.सामान्य माणूस त्यात गेलं की पार त्याची वाईट परिस्थिती होते. पण हे खोटं आहे. होय, कारणं राजकारणात अशीही व्यक्तिमत्व आहेत जे की राजकारणामध्ये आल्याने राजकारण स्वच्छ झालं आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा लोकांनी घेतलेला आहे. मुळात अशा व्यक्तिमत्वाला फक्त नेता म्हणून चालणार नाही तर मातीतला, जनसामान्यांचा, शेतकरी, मजूर, दिन दलित पिचलेल्या घटकांसाठी कार्यरत असणारा आपल्या हक्काचा माणूस आहे असच म्हणावं लागेल.
होय आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा नेता शिवाजी दादा बोबडे बरेच जण विचारतील मग हे दादा बिरुद कशासाठी अर्थात त्याच उत्तर सुद्धा समर्पक असच आहे. घनसावंगी तालुक्यातील प्रत्येकजण त्यांना शिवाजी दादा म्हणतात. बर दादा हे काही मतदान किंवा त्यांच्या समोर म्हणतात असंही नाही जो आपल्या हक्काचा आहे त्याला आदराने दिलेलं ते नाव असतं अगदी तसंच दादाच व्यक्तिमत्व आहे सोज्वळ, निर्मळ हक्कांसाठी लढणारा नेता लोकांशी हे नातं तयार झालंय ते त्यांनी केलेल्या संघर्षामुळे लोकांची भावनिकता, आदर, प्रेम या सर्वच गोष्टी दादा सोबत जोडल्या गेल्या आहेत हे विसरून चालणार नाही. आणि असं बिरुद क्वचितच एखाद्या नेत्याला मिळतं.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी या छोट्याश्या गावातील हा शेतकरी पुत्र लोकांच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या मागण्या शासन दरबारीं लावून धरण्यासाठी चळवळीत उतरला शेतकरी, मजुरांना ज्या अडचणी येतील त्यावर उभा राहत त्यांना प्रकाशमय वाटेने नेणारा हा नेता म्हणून अख्या तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देऊन राजकारणापलीकडील आपला माणूस म्हणून दादांनी ओळख निर्माण केली आहे. सेवा हाच धर्म मानणाऱ्या दादांनी आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची सध्यस्थितिला जबाबदारी स्वीकारली आहे यामाध्यमातून तू जनतेचे प्रश्न सोडवताना दिसतात.
आपल्या समस्यांचे निराकरण करणारा नेता म्हणून लोक त्यांच्याकडे आशेने बघतात. राजकारणात चांगली काम करता येतात ह्याचा परिपाठ इतर नेत्यांनी दादांकडून घ्यावा इतकं कर्तृत्व दादांनी आज निर्माण केल आहे. दादांची लोकांच्या मनावर, हृदयावर राज्य करण्याची पद्धत हीच राजकारणातली स्वच्छ बाजू आहे असे प्रकर्षांने म्हणावं लागेल जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांमुळेच राजकारण अजूनही स्वच्छ आहे असे दिसते. घासावंगी तालुक्याच्या पर्यायाने राज्याच्या राजकारणात दादांनी आगामी काळात प्रवेश करावा अशी तालुक्यातील तमाम जनतेची इच्छा आहे असं म्हणाल्यास वावगे ठरू नये.
कैलास पवार
