माझी बदनामी झाल्यामुळे त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार-रणजित देशमुख
परळी : माझी विनाकारण बदनामी झाल्यामुळे संबंधित युवती व ज्यांनी – ज्यांनी बदनामी बाबत प्रसिध्दी केली त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे रणजित रामराजे देशमुख यांनी यांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
नेहरू चौक भागातील एक युवती गेल्या अनेक दिवसापासुन विनाकारण मला मानसिक त्रास देत असुन तु माझया नादी लागु नको तुझया विरोधात पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करुन तुझया घरासमोर गोंधळ केला जाईल अशी तक्रार रणजित देशमुख यांनी दिली असुन त्या तक्रारीच्या आधारावर परळी पोलिसांना पुजा लहुदास चव्हाण हिच्या विरोधात कलम ५०४,५०६,३४,भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन हा गुन्हा दाखल झाल्यामुळे यांनीही माझयाविरोधात ३७६,३६३, हा गुन्हा दाखल केला असुन तो अत्यंत चुकीचा व माझी बदनामी करण्याचा हेतु आहे.काही वृत्तपत्राने बातमी प्रसिध्दी केली आहे.
यामुळे माझी बदनामी झाली असुन त्यांच्याविरोधात लवकरच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे रणजित यांनी म्हटले आहे.