मांजरसुंबा घाटात इंधनाच्या टँकरने अपघातानंतर घेतला पेट ; एकाचा मृत्यू..

नेकनूर : मांजरसुंबा घाटामध्ये आज सकाळी इंधन घेऊन येणाऱ्या टँकर ने अचानक पेट घेतला व पेट घेतल्यानंतर तो पलटी झाला. काही कळण्याच्या आतच पूर्ण टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. टँकरमध्ये इंधन असल्याने काही क्षणातच मोठा आगडोंब झाला व धुराचे लोळ उठले, रस्त्यावरून जाणारी येणारी वाहने जागच्या जागी थांबली. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला होता.या आगीमध्ये टँकरचा चालक मयत झाल्याची माहिती येत असून अन्य एक जण जखमी झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *