महावितरणमधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची पदे त्वरित भरा अन्यथा उपोषणाचा इशारा…

विद्यार्थ्यांकडून तहसीलदारांना निवेदन सादर

परळी : महावितरणमधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती त्वरित करावी अन्यथा उपोषण करावे लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

परळी तहसील येथे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ऊर्जा विभागामार्फत विद्युत सहाय्यक पदाची व उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली त्यात विद्यार्थ्याकडून विहित नमुन्यात अर्ज सादर करण्यात आली तसेच त्यांची आय बी पी एस नामांकित कंपनीकडून मुलाखत घेऊन तब्बल बारा महिने उलटले असून याची मात्र ऊर्जा मंत्र्यांनी दखल सुद्धा घेतलेली नाही.

महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभागाने विद्युत सहाय्यक पदासाठी जाहिरात क्रमांक 4/ 2019 व उपकेंद्र सहाय्यक पदासाठी जाहिरात क्रमांक 5/ 2019 अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व 25/ 8 /2019 रोजी या दोन्ही पदांची आयबीपीएस या नामांकित कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली मात्र अजून सुद्धा याबाबत ऊर्जा विभागाकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही विद्यार्थ्यांनी ऊर्जा विभागाची संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

याबाबत लवकरात लवकर ऊर्जा विभाग विभागाकडून त्वरित कारवाई व्हावी अन्यथा 01/7 /2020 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती लिपी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य , मा.जिल्हाधिकारी बीड, मा.पोलीस अधिक्षक बीड, मा मुख्य महाव्यवस्थापक महावितरण मुंबई मा अधीक्षक अभियंता बीड महा पोलीस निरीक्षक संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी वैजनाथ यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी दीपक ढाकणे ,विठ्ठल गीते, अशोक गीते, ईश्वर आचार्य, हनुमंत होळंबे, नरहरी घुगे , संतोष फड ,अजित गित्ते , अर्जुन नागरगोजे ,बालासाहेब फड , संदिपान नागरगोजे ,अशोक पाळवदे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *