महारुद्र ट्रस्टच्या वतीने गरजूवंतांना किराणा वाटप


जालना (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरजूवंतांची ही अडचण लक्षात घेऊन जालना शहरातील महारुद्र मारोती चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने सटवाई तांडा या भागातील गरजूवंत कुटूंबियांना किराणा किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला आहे. तसेच जे कामगार आहेत, त्या कामगारांना दररोज जेवणही देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. या उपक्रमाचे या परिसरातील कुटूंबियांनी कौतूक केले आहे. या सामाजिक उपक्रमासाठी अध्यक्ष सुनील जाधव, बाळू जाधव, बाबासाहेब सोनटक्के, विजय जाधव, राजेंद्र म्हस्के, भिमसिंग बिडे आदींनी परिश्रम घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *