महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डेमाॅक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने निवेदने डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत

पूर्णा / प्रतिनिधी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत परंतु अजूनही त्यांच्या खूनात सहभागी असलेल्या संघटना आणि सूत्रधारांना अटक करून त्यांची संपत्ती जप्त करून कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रसिद्ध लेखक विचारवंत एम एम कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या केसेसमध्ये चांगल्या वकिलांची नियुक्ती करावी तसेच समाजात अशांतता निर्माण करणार्‍या धार्मिक मूलतत्त्ववादी लोक आणि संघटना यांच्यावर बंदी आणावी. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी कडक कायदा करावा या मागण्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा पूर्णा व डेमाॅक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मा तहसिलदार पूर्णा यांना निवेदने सादर करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदनावर गणेश पाटील कार्याध्यक्ष डॉ. दिलीप शृंगारपुतळे, शेख नसिर ,अमृत कर्हाळे, राजेंद्र कमळू, प्रमोद ढगे. रेखा शृंगारपुतळे, वर्षा पाटील, बाबासाहेब काशिदे, किरण सूर्यतळ, प्रसेनजीत ढगे, मनोहर उगले, रवि पंडित, तर डेमाॅक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने अनिल मगरे, संदीप साबणे, नसिर शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *