महाराष्ट्रात रक्त तुटवडा निर्माण होउ देणार नाही – आ. लोणीकर

परतुर (प्रतिनिधी) – राज्यात कोरोनासाथीचा प्रादुभाव वेगाने वाढत असून अश्या या गंभीर परिस्थिति मधे महाराष्ट्रात कुठेही रक्ताचा तुटवडा निर्माण होउ देणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. ते परतुर येथील भाजयुमो च्या वतीने मराठवाडा रक्तदान संयोजक राहुल लोणीकर यांनी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कुल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.    ते पुढे बोलताना म्हणाले की, राहुल लोणीकर व त्यांच्या टीम ने परतुर आणि मंठा मंडळामधे 2000 च्या वर विक्रमी रक्तदान करुण घेतले असून मराठवाड़ाभर युवा मोर्च्याच्या माध्यमातून  रक्तदान संयोजक म्हणून राहुल लोणीकर यांच्यावर रक्तदानाची जबाबदारी आहे. मला निश्चितपनाने खात्री असून युवा मोर्च्याच्या माध्यमातून मराठवाडा तसेच राज्यात कुठेही रक्त तुटवडा निर्माण होणार नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामधे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनसामन्याच्या मदतीसाठी भाजपा तत्पर आहे.  केंद्रातील मोदी सरकारने कोरोना संकटाच्या काळात संकटावर मात करण्यासाठी वीस लाख कोटीचे पॅकेज देऊन देशातील व राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केले. शेतकरीसन्मान योजनेतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत, जनधन योजनेतील खात्यावर थेट रक्कम, महिलांना मोफत गॅस या सह मोफत धान्य इत्यांदि सह अनेक योजना राबवत सर्वस्तरातील जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. या वेळी रक्तदान शिबिराची पहानी करत युवा मोर्च्याच्या या उपक्रमाची स्तुति केली.नागरिकांचा उस्पूर्त प्रतिसाद :- सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या रक्तदान शिबिरामधे परतुर शहर व परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्टन चे पालन करत रक्तदान केले रक्तदानात महिलांचा ही सहभाग :- आज सपन्न झालेल्या या शिबिरामधे महिलांनी ही सहभाग नोंदवत  देश हिताच्या या कार्यास हातभार लावला.मुस्लिम बांधवांचा रक्तदानात मोठा सहभाग :-  भाजयूमो च्या या रक्तदान शिबिरामधे  शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत रक्तदान शिबिरात  सहभाग नोंदवला.या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रमेश भापकर, संपत टकले, सुबोध चव्हाण, प्रवीण सातोनकर,शत्रगुण कणसे, अशोक बरकुले, संदीप बाहेकर, रोहन आकात, प्रकाश चव्हाण, कृष्णा अरगडे,प्रशांत बोनगे, राजेंद्र मूंदडा, बंडू मानवतकर, नदीम शेख, रमेश आढाव, दत्ता बिल्हारे, प्रदीप कादे, अभिषेक सोलंके, गणेश सोलंके, बंडू भुंबर, नितिन जोगदंड, विष्णु मचाले, शुभम कोठारे, मलिक कुरैशी, शाकेर क़ायमखानी, सोनू अग्रवाल,ज्ञानेश्वर जईद, संतोष हिवाळे,विशाल कदम, राज सोलंके,मधुकर घनवट, रमेशराव चव्हाण,भीमा बरकुले,दत्ता बरकुले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी रामप्रसाद थोरात,भगवान मोरे, दया काटे, बालाजी सांगूले, संभाजी खवल, ओम सेठ मोर, पद्माकर कवडे, रामेश्वर तनपुरे, जितु आन्ना अंभूरे, डॉ.नवल, डॉ.सय्यद,डॉ.घुगे डॉ.स्वप्निल मंत्री,यांची उपस्थिती होती.रक्तसंचयासाठी जनकल्याण रक्तपेढ़ीचे शिवराज जाधव व सहकारी त्याच बरोबर नांदेड़ येथील गुरु गोविंदसिंग रक्तपेढ़ी नांदेड़, न्यू लाइफ रक्तपेढ़ी परभणी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *