महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अजूनही गंभीर
मुंबई, (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम आहे. राज्यात करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे. चिंतेची बात म्हणजे राज्यात काल करोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला होता तर आज ३२ रुग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ९ हजार ९१५ झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज एकाच दिवसात २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ५९३ रुग्णांनी करोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. हा आकडा वाढावा म्हणून आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.
कालच्या तुलनेत राज्यात करोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट पाहायला मिळाली. मंगळवारी राज्यात करोनाचे ७२९ नवीन रुग्ण आढळले होते. त्या जागी आज (दि.29) कोरोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले. हाच कायतो दिलासा म्हणता येईल.