महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त वीरशैव समाजातील 100 गरजूंना अन्नधान्य – वीरशैव विकास प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम

परळी : क्रांतीसुर्य, समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आज वीरशैव विकास प्रतिष्ठान परळीच्या वतिने विधीवत पुजा आणि आरतीने साजरी करण्यात आली. दरम्यान जयंतीचे औचित्य साधून वीरशैव विकास प्रतिष्ठानने समाजातील 100 गरजूंना घरपोहंच एक महिन्याचे अन्नधान्य वाटप केले. महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती वीरशैव विकास प्रतिष्ठानच्य वतिने आज आगळया वेगळया उपक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. सध्या कोरोना आजाराने देशभरात थैमान माजविले असून सुमारे महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने अनेक कुटूंंबांना अन्नधान्याची चिंता निर्माण झाली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मोठ्या उत्साहात होणारा कार्यक्रम रद्द करीत त्यातून वीरशैव समाजातील 100 कुटूंबांना एक महिन्याचे अन्नधान्य थेट घरपोहंच करण्यात आले. या अनुषंगाने दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले विविध स्वरूपातील अन्नधान्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमास वीरशैव समाजाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके गुरूजी, प्रा.सुधीर फुलारी, वीरशैव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामभाऊ बुद्रे, महादेव इटके, शिवकुमार केदारी, विकास हालगे, सुशिल हरंगुळे, आत्मलिंग शेटे, राजेश साखरे आदी उपस्थित हेाते.

लाख मोलाची मदतपरळीत लॉकडाऊन असल्यामुळे समाजातील हातावर पोट असलेल्या शेकडो व्यक्तींना त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतांना अनेक अडचणी येतात. अशावेळी मदतीचा हात अत्यंत महत्वाचा असून पुढील महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य वीरशैव विकास प्रतिष्ठानने आम्हाला दिले असून ही मदत लाख मोलाची आहे अशी प्रतिक्रिया अनेक समाज बांधवांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *