महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपने केला जाहिर निषेध

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – भाजपच्या वतीने आज दि.19 मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या माध्यमातून महाआघाडी सरकार कोविड 19 रोकण्यास असमर्थ झाल्याने तहसिलदार यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. एकीकडे संपूर्ण देशात छोटी छोटी राज्य केंद्र शासनाच्या मदतीने कोविड-19 संसर्गावर सक्षम प्रशासनाने उत्तम समन्वय आणि दुरदृष्टीने उपाययोजना करत महामारी आटोक्यात आणताना दिसत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सरकारी आरोग्य आणीबाणीच्या काळात अकार्यक्षमतेमुळे निर्णय प्रक्रिया गोंधळामुळे भ्रष्ट कार्यपद्धतीमुळे केंद्रातून मिळणाऱ्या मदतीचा आणि पॅकेजचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यात असमर्थ ठरत आहे.
गेल्या आठवड्यात आलेल्या केंद्रीय समितीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली नाही 76 हजार बेडची गरज असताना थातूरमातूर उपाययोजना करून राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे. जगभर कौतुकास पात्र ठरलेल्या डॉक्टर नर्स सर्व आरोग्य सेवक तसेच फ्रेंड लाईट वर काम करणारे पोलिस दल, सुरक्षा दल यांच्या आरोग्य हितासाठी पाठवलेले पीईपी किड्स त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही.
गोरगरीब निराधार ,श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजने द्वारे मिळणारी रक्कमही राज्यशासनाने अजूनही लाभार्थ्यांना वितरित केली नाही. तसेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला दिलासा देणारे एकही योजना तयार केलेले नाही .कोविड- 19 टेस्ट मध्ये फेल आहे म्हाणुन या सरकारविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन च्या माध्यमातून बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार ओमप्रकाश गौंड यांच्या कडे निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आले यावेळी बिलोली भाजपा तालूकाध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे, विधानसभा प्रभारी उमाकांतराव गोपछडे,युवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष इंद्रजीत तुडमे, शांतेश्वर पाटील ,सय्यद रियाज,विजयकुमार कोदळे ,बालाजी पाटील, साईनाथ शिरोळे अदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *