महसुल बुडाला तरी चालेल पण माझा जिल्हा सुरक्षित राहिला पाहिजे ; कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे अभिनंदन…!
परळी : महसुल बुडाला तरी चालेल पण माझ्या जिल्हयातील माणुस सुरक्षित राहिला पाहिजे हा दृष्टीकोन ठेवुन कर्तव्यदक्ष व माणुसकीचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दारू बंदीने कायम ठेवल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे ही गोष्ट जिल्हावासीयांच्या अभिंनदनाची बाब आहे
देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे परंतु बीड जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये या दृष्टीकोणातुन जिल्हाधिकारी रेखावार व त्यांच्या सहकार्याने योग्य पध्दतीने नियोजन सुरू असुन त्याच नियोजनामुळे जिल्हयात कोठेही गर्दी होत नसुन सर्वच नियमाचे पालन करत आहेत.गेल्या ४० दिवसापासुन जिल्हयात लॉकडाउन सुरू असुन जिल्हयातील जनता ही त्याच पध्दतीने लॉकडाउनचे नियम पाळत आहे परंतु तळीरामांची गैरसोय त्यांना माणसिक त्रास होत आहे.ही कल्पना जिल्हाधिकारी यांना असावी पण माणुस सुरक्षित राहिला पाहिजे त्याच दृष्टीकोणातुन त्यांचे नियोजन चालु आहे दारू विक्रि मधुन मोठया प्रमाणात शासनाला महसुल मिळतो ही बाब सर्वांनाच ज्ञात आहे माणुस जगला तर देश जगण ही गोष्ट लक्षात घेवुन महसुल जरी बुडाला माणुस सुरक्षित राहिला पाहिजे ही बाब महत्वाची असल्यामुळे जोपर्यंत ग्रीन झोन व जिल्हयातुन कोरोना १०० टक्के नष्ट होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दारूबंदीबाबत निर्णय घेवु नये अशी अपेक्षा ही जनतेत व्यक्त होत आहे.