मराठा युवा वर्गाने धैर्याने वाटचाल करावी- संवाद मार्गदर्शन चर्चासत्रात अभ्यासक -राजेंद्र दाते पाटील यांचे आवाहन

औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात महाराष्ट्रातील पहीले “आरक्षण व सारथी “यावरील विषयावरील ” युवा संवाद व मार्गदर्शन ” चर्चा सत्र दोन सत्रात अगदी उल्लेखनीय व शिस्तबद्ध रित्या पार पडला विद्यार्थी- युवक व महिला सर्वांनीच यात सहभाग नोंदवला आणि संवाद साधला. या चर्चासत्रात मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचीकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्य वक्ता म्हणून उपस्थित विद्यार्थी- तरुण वर्गाला न्यायालयातील आरक्षणाची सद्य स्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती कशी दिली आणि स्थगिती उठवण्याचे विविध पर्याय या वर अत्यंत कायदेशीर माहीती घटनात्मक तरतुदी यांचे सुंदर विवेचन करतांना जणु काही प्रत्यक्ष न्यायालयातील सुनावणीच आपण ऐकत आहोत असे वातावरण सभागृहात निर्माण झाले होते.अशीच महत्वपूर्ण माहीती त्यानी स्पर्धा परीक्षा -संशोधक विद्यार्थी व इतर लाभार्थी यानां देऊन शासनाने अधिकचा निधी कसा व का उपलबध करुन द्यावा यावर सखोल मार्गदर्शन करुन आता “डी सेंट्रलाईज़ ” मेथड शासनाने आंमलात आणुन राज्यात महसुल विभाग निहाय सारथी संस्थेचे सेंटर कसे असावे यावर भर देऊन विस्तृत मार्गदर्शन करुन शासना कडे मोठ्या प्रमाणावर पाठ पुरावा करुन जास्तीत जास्त सुविधा मराठा विद्यार्थी व तरुणांना उपलब्ध करुन घेण्यावर सविस्तर विवेचन करुन मराठा तरुणांनी सयंमाने मार्गक्रमण करुन अविचार टाळावा असे आवाहन करतांना तुमच्या मागे समस्त समाज ताकदीने व खंबीरतेने उभा असल्याचा विश्वास दिला.या प्रसंगी उपस्थित संशोधक छात्र-तरुण यांच्या अनेक प्रश्नांचे अगदी समर्पक उत्तरे देऊन त्यांना समाधानी केले. विशेष बाब म्हणजे हा कार्यक्रमात संपूर्णत:हा सर्वसामान्य मराठा युवकांनी-विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे विधीज्ञा सुवर्णा मोहीते- नितीन कदम- विकी पाटील -अंकुश पलोदकर, कल्पना निकम मोहीते अनुराधा ठोंबरे, संध्या मोहीते- खरात , विधिज्ञ प्रशांत इंगळे, युवराज बोरसे लक्ष्मण मिंड, ,सोनल चौबे, कल्पना निकम,डी एम पाटील, हेमा पाटील,डॉ.रंगनाथ काळे,चेतन डाखोरे,ज्ञानेश्वर निकम,गणेश गालांडे,अजय गंडे,अर्जुन कदम,योगेश शिंदे,पुरुषोत्तम मोरे,गजानन सोनवणे या सह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम संघटना विरहीत राजकीय पक्ष विरहीत संपूर्ण पणे सर्वसामान्य मराठा युवा पिढीचा होता व ” नवे पर्व युवा सर्व ” या विशेष ब्रिदासह मराठा क्रांती युवा मोर्चा ने आयोजन केला होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संध्या मोहीते-खरात यानी अत्यंत खुमासदार पणे करुन कार्यक्रमास एका विशिष्ट उंचीवर पोहचवीला तर प्रस्तावीक सुवर्णा मोहीते यांनी केले व राज्यातील पहील्या अशा या कार्यक्रम आयोजना चे वृतांत उपस्थिता समोर मांडले. तर युवकांचे मनोगत विकी पाटील यानी व्यक्त करतांना युवकांना व विद्यार्थी वर्गाला शास्वत प्रगतीचा मार्ग शासनाने निर्माण करावा असे नमुद केले केले तर समारोप व उपस्थितांच्या सहभागा बद्दल आभार नितीन कदम यांनी व्यक्त करतांना विवेकानंद महाविद्याल याने परिसवांदा साठी जागी उपलब्ध करुन दिल्या बद्दल संस्था चालक- प्राचार्य व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले. करोना च्या परीस्थीतीत सोशल डीस्टसींग पाळत सैनिटायजर व मास्क चा यथा योग्य वापर करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

80 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *