मनीषा वाल्मीकी हिच्या हत्या बाबत राष्ट्रीय महिला आयोग गप्प का ; अँड अविनाश गंडले!
बीड : उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मिकीच्या वर 4 आरोपींनी बलात्कार करून मनिषाची जीभ कापून टाकली असे घृणास्पद कृत्य केले व ती दि.29/09/2020 रोजी मयत झाली आहे.
याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने तात्काळ आवाज उठवून प्रकरणात योग्य पद्धतीने न्याय मिळवण्याच्या उद्देशाने सदरील प्रकरण हे सी बी आय कडे वर्ग करण्यात यावे कारण आरोपी हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत त्यामुळे आरोपी हे मयत पीडितेच्या नातेवाइक यांच्या वर दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बाबत स्वतःहून दखल घेतली होती तशाच प्रकारची दखल मनीषा वाल्मिकी बद्दल आहे. प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करणे गरजेचे आहे असे न करता राष्ट्रीय महिला आयोग आत्तापर्यंत गप्प का आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने पीडितेची जात पाहू नये पीडितेवर झालेला अन्याय पहावा व पीडित एस न्याय मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील रहावे अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे बीड येथील सामाजिक कार्यकर्ते बीड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड अविनाश गंडले यांनी केली आहे.
हाथरस येथील प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्रातील सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली आहे देशभरात महिला व मुली सुरक्षित नसल्याचाच सुड सर्वांनी काढला आहे येथे जातीचा धर्माचा किंवा पंथाचा विषय नसून. हा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे उत्तर प्रदेश सरकारने आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पोलिस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली नाही पीडित कुटुंबाला धमक्या दिल्या गेल्या मनीषा वाल्मिकीचा करुण अंत झाला मात्र याची दखल राष्ट्रीय स्तरावरील मिडियाने घेतली नाहीत राष्ट्रीय महिला आयोगाला बॉलिवूडमधील अभिनेत्रींबद्दल प्रेम आहे मात्र बलात्कार व हत्या झालेल्या पीडितेची काही देणे-घेणे नसल्याचे अँड अविनाश गंडले यांनी म्हटले आहे जात पाहून तोंड उघडू नका पीडितेला न्याय देण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असणार या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवण्यात आले असून निषेध मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे अँड गंडले यांनी म्हटले आहे.