मका पीक झाले भूईसपाट; पंचनामे करण्याची मागणी

कन्नड (प्रतिनिधी) – गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या  सुमारास आलेल्या वादळीवाऱ्यासह  पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 कन्नड तालुक्यामध्ये वादळीवाऱ्यासह  पाऊस झाल्याने मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.औराळा धनगरवाडी औराळी विटा चापानेर बनशेंद्रा सिरजगाव शिरोडी जेऊर चिंचखेडा बिपखेडा या परिसरातील शेतकऱ्यांनी मका या  पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.नुसकानीमुळे शेतकरी खचला असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

62 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *