मंदिरे लवकर उघडा अन्यथा तिव्र आंदोलन करू- राजेश गित्ते

परळी प्रतिनिधी-दार उघड उध्दवा,दार उघड हर महादेव या घोषणेने परळी नगरी दणाणुन गेली होती मंदिरे उघडा या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आली.मंदिर लवकर उघडा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी दिला. राज्यातील सर्वच मंदिरे गेल्या ३ ते ४ महिन्यापासुन बंद असल्यामुळे भाविक भक्तांची अडचण निर्माण होत आहे म्हणुन दि.२९ रोजी माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज वैद्यनाथ मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आली यावेळी भाजपाचे युवक नेते रवि कांदे,मांडव्याचे सरपंच सुंदर मुंडे,मिरवटचे सरपंच धुराजी साबळे,खोडवा सावरगावचे सरपंच अरूणजी दहिफळे,माजी प.स.सदस्य मारोतराव फड,प्रा.अजय गित्ते,धुराजी बदने माऊली फड यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *