मंत्रालयात सामान्य नागरिकांना केव्हा प्रवेश देणार?

मुंबई /सुरेश वाघमारे मंत्रालयात सामान्य नागरिकांना आजही प्रवेश दिला जात नसून प्रवेशद्वारावरुन परतवून लावले जात आहे.बमंत्रालयात सामान्य नागरिकांना केव्हा प्रवेश देणार? असा सवाल करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस प्रवेश देण्याची विनंती केली आहे.  आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांस पत्र पाठवून निवेदन केले आहे की कोव्हीड काळात मंत्रालयात अधिकारी-कर्मचारी वृंद नसल्याने प्रवेश दिला जात नव्हता. आता परिस्थिती वेगळी असून मंत्रालयात उपस्थिती बंधनकारक आहे. परंतु सामान्य नागरिकांना विविध बाबीची तक्रार किंवा अन्य पत्रव्यवहारासाठी मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. प्रवेश द्वारावर विभागात पत्र घेण्यासाठी कोणी कर्मचारी नसल्याची सबब पुढे केली जाते प्रत्यक्षात सर्व विभागात कामकाज सुरु आहे.  गलगली पुढे म्हणतात की कोव्हीडच्या पाश्वभूमीवर सरसकट प्रवेश दिला जात नाही, ही बाब योग्य आहे पण ज्या नागरिकांना पत्र देऊन सही व शिक्का घ्यायचा आहे त्याची खातरजमा करत प्रवेश देण्याची आवश्यकता आहे. तरी याबाबतीत संबंधितांना मंत्रालयात सामान्य नागरिकांना पत्र रजिस्ट्रार विभागात नोंदणी करण्यासाठी प्रवेश देण्याबाबत सूचना जारी करण्यात याव्यात, अशी मागणी गलगली यांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *