मंठा तालुक्यात नानसी पुनर्वसन येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

मंठा (प्रतिनिधी) – मंठा शहरातील जवळ असलेल्या नानसी पुनर्वसन येथे 42 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, 15 पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथून आपल्या कुटुंबासह हा व्यक्ती  आला होता. त्याला दि. 23 मे 2020 रोजी पासून खोकला व गळा दुखणे असा त्रास होत असल्याने त्यांनी मंठा शहरातील एका खाजगी डॉक्टरांना दाखविले मात्र संबंधित डॉक्टरने प्रवास इतिहास व लक्षणानुसार त्या व्यक्तीला बाहेरूनच औषधी लिहून दिले. मात्र त्यास बरे वाटतं नसल्याने त्याला दि. 27 मे 2020 रोजी उपकेंद्र वाजोळा येथील आरोग्य सेविका श्रीमती रेणुका उबाळे यांनी ग्रामीण रुग्णालय मंठा येथे पाठविण्यात आले. व त्यांचे लाळेचा नमुना जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पुढील तपासणी साठी पाठविण्यात आलेल्याने दि. 29 मे 2020 रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह असा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार दि. 30 मे 2020 रोजी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार सुमन मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपक लोणे, गटविकास अधिकारी सुरडकर, यांनी पथकासह भेट देऊन पाहणी करून त्या व्यक्तीचे संपर्क मधील 18 व्यक्तीना मंठा येथील मॉडेल स्कुल येथे पुढील तपासणी करण्या करीता पाठविण्यात आले आहे. तसेच पुढील 14 दिवस हे गाव प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्याचा आरोग्य विभागाचे वतीने 2 पथकामार्फत आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक लोणे यांनी दिली आहे.

539 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *