भोकर येथील सराफा बाजारात भेसळयुक्त सोन्याची विक्री: ग्राहकांची केली जाते लूट *************”””*******
भोकर +(तालुका प्रतिनिधी)येथील सराफा बाजारात 24 कॅरेटचे सोने भासवून भेसळ युक्त सोन्याची विक्री करून ग्राहकांची लूट केल्या जात आहे. भोकर शहरातील सराफा बाजारात 24 कॅरेटचे सोने भासवून हलक्या दर्जाचे भेसळयुक्त सोने व कमी कॅरेटचे सोने ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे, दिवसा ढवळ्या ग्राहकांची लूट होत असल्याने येथील सराफा बाजारातील व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे भोकर येथील सराफा बाजारात जी.एस.टी. कर चुकविण्यासाठी कच्ची पावती दिली जाते पक्क्या पावती चा वापर कुठेही केल्या जात नाही 24 कॅरेट सोने 91.6 होल मार्क ऐवजी 20 कॅरेट सोने व होलमार्क नसलेले सोने विक्री करून ग्राहकांची पिळवणूक केली जाते सोन्याचे कॅरेट तपासण्याची मशीन नांदेड येथे आहे मात्र भो क र बाजारात कॅरेट तपासण्याची मशीन उपलब्ध नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे काही अडचणीत असलेले शेतकरी व ग्रामीण भागातील महिला सोने विक्री साठी भोकर येथील सराफा बाजारात येतात तेव्हा त्यांची खरेदी अत्यंत कमी भावाने 18 टक्के कमी दराने खरेदी केल्या जाते सोन्याचे वजन करताना चारही बाजूने काच असावा लागतो मात्र इथे तसे होताना दिसत नाही सोन्याचे वजन करताना पंखा लावल्या जातो त्यामुळे वजनात कमी-जास्त पणा येतो कच्ची पावती देऊन शासनाची जी.एस.टी चुकविणाऱ्या भोकर येथील सराफा बाजाराची उत्पन्न कर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी तसेच वजनमापे निरीक्षक यांच्या मार्फत सराफा व्यापाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहकातून होत आहे.