भीमा कोरेगाव दंगलीमध्ये पोलीस उपाधीक्षक यांच्या वाहनावर दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता ; अँड अविनाश गंडले!
बीड : प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की दि.02/01/2018 रोजी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांनी कार्यालय आदेश क्रमांक 2017/ आर.बी. डेस्क-1/ पोल-1/ डिसेंबर 2017 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले व पोलिसांचे शासकीय वाहन क्रमांक MH23.AF.0120 चे नुकसान केले व पोलिस पेट्रोलिंग करत असताना बुद्ध विहार माळीवेस बीड कडून मोटारसायकलवर आलेल्या तरुणांनी पोलीस वाहनाच्या पाठीमागच्या बाजूने दगडफेक केली वहनाचे व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गु.र.नं.5/2018 कलम 353,336,34 या.द.वि. व कलम 3 सरकारी मालमत्ता नुकसान कायदा 1984 प्रमाणे.
1) किरण शिंदे 2) प्रेम तांगडे 3) राहुल शिंनगारे 4) अभिजीत निकाळजे 5) ऋषिकेश सवाई 6) अजिंक्य पवळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सदरील प्रकरणात सरकार पक्षाकडून चार साक्षीदार तपासण्यात आले
या प्रकरणात मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय बीड श्री एच. एस. महाजन साहेबांनी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून या सर्व आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता केली
या प्रकरणात सर्व आरोपी कडून अँड अविनाश गंडले यांनी काम पाहिले त्यांना अँड इम्रान पटेल, अँड बाप्पा माने, अँड किशन मस्के, अँड सुरक्षा वडमारे, अँड गोवर्धन पायाळ, अँड रईस पठाण, व अँड तेजस नेरहरकर यांनी सहकार्य केले.