भा.ज.पा. ग्रामीण च्या वतीने खडका येथे मास्क व सॅनिटाइजर चे वाटप
सोनपेठ / मंजूर मुल्ला : कोरोना विषाणु ने परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही पाय पसरायला सुरुवात केली आहे. काल शेळगाव येथे एकाच दिवशी सहा कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आज भारतीय जनता पक्ष ग्रामीण च्या वतीने सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथील ग्रामस्थांना मास्क व स्यानेटायझर चे वाटप करून कोरोना पासून बचावकरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना विषाणू महाराष्ट्रात हि वेगाने पसरत आहे. मुंबई पुण्याला कामानिमित्त गेलेले कामगार मूळ गावी परतत असल्याने ग्रामीण भागात ही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामुळे शहरासह आता ग्रामीण भागावर ही लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. त्यातच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे काल एकाच दिवशी 6 कोरोनाबधित रुग्ण आढळून आले. या बाबीचे गांभीर्य ओळखून शिवाजीराव माव्हाळे यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्ष ग्रामीण च्या वतीने मौजे खडका येथील ग्रामस्थांना मास्क व स्यानेटायझर बाटल्या मोफत वाटप करण्यात आले तसेच विषाणू पासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन ही करण्यात आले.यावेळी भाजपा ग्रामीण चे जिल्हा सचिव शिवाजीराव मव्हाळे यांच्यासोबत खडक्याचे पोलीस पाटील वैजनाथ यादव,कृष्णा यादव, ज्ञानोबा मव्हाळे, बापू चव्हाण आदी उपस्थित होते.