भाजप ने लोकभावनेचा बाजार करु नये – अँड. मनजीत सुगरे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – सिल्वर ओक वर पत्रांचाभडिमार करण्या ऐवजी देशातील कोरोना पेशंट आणि वैद्यकीय सेवा करणाऱ्याना अधिक काही आर्थिक, सामाजिक मदत करता येईल ते पहाने आज गरजेचे आहे.श्रीराम मंदिराची बांधनी निश्चित व्हावी आम्ही सुद्धा एक का होईना विट देनारच आहोत पन एखादयाने उपायात्मक किंवा संशोधनात्मक बोलले तर स्वागतच करायला हवे परंतु इथे तर भक्त भलतेच सोंग अनुन कथित भक्तिचा महायज्ञ करुण मंदिरासह धर्माचे ठेकेदार असल्याचे दाखावित आहेत. आम्ही पण श्रीराम भक्त आहोत परंतु 1989 पासुन देशाला झुलवीत ठेवून सत्तेचे शिखर गाठणाऱ्या भाजपाला शरद पवार साहेब का इतके झोंबावे ? ना राम मंदिरला कधी विरोध ना मंदिर बांधन्यास विरोध!कोरोना सारखा साथ रोगाच्या अजार वेलाने देशालाच नव्हे तर जगाला व्यापुन घेतले आहे अशा परिस्थित देशातील जनतेचे स्वास्थ्य महत्वाचे आहे त्यामुळे देशाच्या प्रमुख व्यक्तिने सर्वात जास्त वेळ यासाठी खर्च करने आवश्यक वाटते म्हणुनच पवार साहेबांनी पंतप्रधान महोदयांचे याकडे लक्ष केंद्रीत केले आणि नमो भक्तांचे तिळपापड होऊन त्यांचे रुपांतर लगेच राम भक्तात झाले.आणि नमो भक्त विसरून गेले की हेच पवार होते ज्यानी गलवान खोऱ्या बाबत भारत सरकारने चिन विरोधी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.तेव्हा मात्र भक्त गाढ़ झोपेत होते.हल्या दूध देतो का ? तर सकाळ संध्याकाळ मिळून दहा लीटर देतो असे जनतेने म्हणावे हिच भक्त गानांची जर भोळी भाबड़ी भावना देशातील जनते बाबत असेल तर हा फसवेपना बंद व्हायला पाहिजे.देशाचा चौकीदाराला सुद्धा कधी कधी झोपेची डुलकी लगते म्हणूनच डुलकी लागलेल्या चौकीदाराला जागे करण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे, मग जागे करने हे काय पाप आहे का ? जर असेल तर जनतेला सांगा की आम्हाला जागे करु नका.आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महाकाय मूर्तिची अवस्था अगोदर पहा.महाकाय करण्याच्या नादात मामुली लोकांना विसरु नका.तुम्ही चौकीदार आहात तर चोख पणे चौकीदारी करा हिच आमची भावना आहे बाकी काही नाही.कोणत्याही मुददयाचे राजकरण करायचे,जनतेला भावनिक करायचे आणि त्यांची दिशाभूल करायची याला आम्ही राम भक्ती म्हणायची की देश भक्ती.निश्चितच तुमच्या पत्रांचे आम्ही स्वागत करु पन पत्र हे संदेश वाहक आहेत ज्यामध्ये काळजी,विनंती,विचारपुस,सुचना आणि मार्गदर्शन असावे परंतु आपन असे न करता श्रीराम नावाच्या आड़ राजकरण करुण जनतेची दिशाभूल करुन लोकभावनेचा बाजार करु नका असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष अँड. मनजीत सुगरे यांनी करुण परलित भाजपा ने केलेल्या पत्र स्टंट चा समाचार घेतला.