Newsबीड जिल्हा

भाजपा बीड तर्फे पत्रकारांची आरोग्य तपासणी आणि जीवनावश्यक साहित्यांची किट वाटप

बीड : उद्या मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवीन भाजी मंडईतील पत्रकार भवन येथे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार,कॅमेरामन व प्रेस फोटोग्राफर यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.आरोग्य तपासणी नंतर सन्मानपूर्वक जीवनावश्यक साहित्यांची किट दिली जाणार आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि भाजपाचे युवा नेते भगीरथदादा बियाणी तसेच डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या पुढाकारातून सदरील उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.या स्तुत्य उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार,कॅमेरामन आणि प्रेस फोटोग्राफर यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.कोरोना महामारीमुळे देश लॉक डाऊन झाला आहे.अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र सृष्टी देखील आर्थिक अडचणीत सापडली आहे.इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील गरजवंत पत्रकार आणि श्रमिक कामगारांना जीवनावश्यक साहित्य देण्यासंदर्भात पत्रकार संघाने दानशूरांना आवाहन केले होते.या आव्हानाला भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.भाजपा लोकनेत्या मा.पालकमंत्री पंकजाताई मुंडे, विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील गरजवंतांना मदतीचा हात भाजपा तथा ताई निष्ठावंत देत आहेत.लोकशाहीचा महत्त्वपूर्ण चौथा स्तंभ देखील आज लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. माध्यमांतील श्रमिक कामगार आणि काही पत्रकारांवर देखील आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत ताईंच्या आदेशावरून बीड शहरातील संपादक,पत्रकार,प्रेस फोटोग्राफर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रेस कॅमेरामन यांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राची राजधानी  मुंबई येथे झालेल्या आरोग्य तपासणीमध्ये जवळपास 53  पत्रकार आणि कॅमेरामन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.या पार्श्वभूमीवर बीड  जिल्ह्यातील पत्रकारांची काळजी घेणे नैतिक कर्तव्य समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य शिबिरा सोबतच गरजवंत पत्रकार,प्रेस फोटोग्राफर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रेस कॅमेरामन यांना सन्मानपूर्वक  जीवनावश्यक साहित्यांची किट देखील  देण्यात येणार आहे.उद्या 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी भाजी मंडई येथील  पत्रकार भवनाच्या सभागृहात  आरोग्य शिबीर पार पडणार आहे. या पूर्वप्राथमिक आरोग्य तपासणीमध्ये प्रामुख्याने रक्तातील साखरेचे प्रमाण,रक्तदाब,अंगातील ताप अशी जनरल आरोग्य तपासणी भाजपाचे युवा नेते भगीरथ दादा बियाणी,डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात येणार आहे.त्याचबरोबर कोरोनाशी लढाई करण्यासाठी मास्क आणि सैनीटायझरचे वाटप देखील करण्यात येणार आहे.तेव्हा या स्तुत्य उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व दैनिकांचे संपादक,पत्रकार,इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व जिल्हा प्रतिनिधी,पत्रकार,कॅमेरामन,प्रेस फोटोग्राफर यांनी नवी भाजी मंडई बीड येथील पत्रकार भवन सभागृहात सकाळी 11 ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा राहावे.असे आवाहन पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *