भविष्य निर्वाह निधीचे ब्लॉक बीडीएस सुरु करावे ; मराठवाडा शिक्षक संघाची राज्य शासनाकडे मागणी…!

परळी : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी अंतर्गत परतावा/ना परतावा कर्ज व अंतिम निकासी रक्कम मिळण्यासाठी ब्लॉक केलेले बीडीएस सुरू करण्यात यावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.घाडगे व सरचिटणीस व्ही. जी.पवार यांनी शिक्षक संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री,वित्तमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आसल्याची माहिती म.शि.संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यातील ज्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते असून ज्यांची या खात्यामध्ये नियमित कपात केल्या जाते अशा कर्मचा-यांना या खात्यामधुन परतावा/नापरतावा कर्ज मिळण्याची सोय आहे.पंरतु कोरोना महामारीचे संकट आल्यापासून याचे बीडीएस शासनाने बंद केले असल्याने या संदर्भातील अनेक प्रकरणे वेतन पथक अधिक्षक स्तरावरच प्रलंबित आहेत.असे शिक्षक संघाने पाठवलेल्या निवेदनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा असलेली रक्कम शिक्षक कर्मचा-यांने त्याला मिळणाऱ्या मासिक वेतनातून जमा केली आसल्याने त्याची ती स्वतःची पुंजी आहे.नियमानुसार काही अत्यावश्यक कामासाठी त्यातून रक्कम काढण्याची तरतूद आहे.म्हणून अनेक कर्मचा-यांनी आपली प्रकरणे दाखल केली आहेत. पंरतू बीडीएस ब्लॉक आसल्याने ही प्रकरणे तसीच धूळखात पडून आहेत. त्यामुळे शिक्षक कर्मचारी यांची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत.तसेच जे शिक्षक कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची ही भविष्य निर्वाह निधीमधील अंतिम निकासी रक्कम सदर बीडीएस ब्लॉक केले आसल्याने त्या रक्कमा मिळण्यापासून ते वंचित आहेत.म्हणून सदर ब्लॉक आसलेले बीडीएस सुरू करून शिक्षक कर्मचारी यांच्यावर होत आसलेला अन्याय दूर करावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, सरचिटणीस व्ही.जी.पवार यांच्यासह केंद्रीय कार्यकारणी सदस्य आशोक मस्कले, जिल्हाध्यक्ष डि.जी.तांदळे, सचिव राजकुमार कदम यांनी केली आसल्याची माहिती बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

171 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *