बेलापुरी व सिरसदेवी येथील कन्टेनमेंट झोन शिथील ; परिस्थिती पूर्ववत !!

बीड : तालुक्यातील बेलापुरी व गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे कळविले आहे.

यामुळे बीड तालुक्यातील बेलापुरी व गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील या परिसरातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *