बॅक खातेदारांना मोठा दिलासा ; रविवारीही बँका खुल्या राहणार – राहूल रेखावार
बीड : जिल्ह्यातील सर्व बँकांना बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी महत्वपूर्ण सूचना आज (दि.16) रोजी दिली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या पूर्वीच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व बँका विषम दिनांकास उघडतात. त्याप्रमाणे उद्या (दि.17) रोजी विषम तारीख असून रविवार येत असल्यामुळे जिल्हाधिकार्यांनी नवीन आदेशान्वये सुटी रद्द करत सर्वच् बँका खुल्या राहतील असे आदेशित केले आहे. दरम्यान, शेतकर्यांसह सर्व बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून सुटीदिवशीही व्यवहार सुरळीत राहणार आहेत.