बीड शहरासह काही गावातील संचारबंदी उठली…!

बीड : शहरासह जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी हटविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रात्री उशिरा काढलेल्या आदेशात जाहीर केले आहे
कंटेनमेंट झोन आणि बफर झोन वगळता इतर ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे आदेशीत करण्यात आले आहे.
कारेगाव ता. पाटोदा येथील एका बाधित व्यक्तीने बारा गावात संपर्क केल्याने आढळून आल्यानंतर हे गाव सील करण्यात आले होते या गावातील त्या बाधितांचे संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्यामुळे या भागातील संचारबंदी उठविण्यात आली आहे
शिथिल करण्यात आलेल्या गावांमध्ये बीड शहर व बीड तालुक्यातील खंडाळा चव्हाटा पालवन व इट. पाटोदा तालुक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही. व धारवंटा केज तालुक्यातील खरमाटा व धारूर तालुक्यातील पारगाव यांचा समावेश आहे तर मोमीनपुरा- अशोक नगर, जय भवानी नगर, सावतामाळी चौक, संभाजीनगर बालेपीर येथील परिसरात प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवण्यात येत आहे असे आदेशात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *