Latestबीड जिल्हा

बीड शहरात संचारबंदीकाळात दूध, जारचे पाणी, भाजीपाला व फळांच्या घरपोच सेवांसाठी शिथीलता—जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड : शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यामूळे नागरिकांना घराबाहेर पडून अत्यावश्यक सामानांची खरेदी करणेस अडचण निर्माण होत असल्याने बीड शहरात संचारबंदी काळात दूध, जारचे पाणी, भाजीपाला व फळे अशा काही बाबींच्या घरपोच सेवांसाठी शिथीलता देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

बीड शहरात फक्त फिरते दुध विक्रेते यांना परवानगी राहील. तसेच कोणत्याही दुकानदारामार्फत दुध विक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दुधांची पाकीटांची होम डिलेव्हरी करावी व ती करत असतांना कोवीड-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.

जार वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटपन करता ग्राहकाकडील उपलब्ध मांडयामध्ये पाणी दयावे आणि त्यावेळेस कोवीङ-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाॅटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास दयावे व रिकामी जार परत न घेता त्याच जार मध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा दयावी. तसेच सर्व वॉाटर
सप्लायर्स कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी.

परवानाधारक भाजी य फळ विक्रेते यांना पूर्वी प्रमाणे परवानगी राहील, परंतु त्यांनी घरोघरी जावूनच विक्री करावी.

घरगूती गॅस घरपोच सेवा देताना गॅस कंपनीचा गणवेश परिधान कराया व त्यांचे गणवेश नसलेले कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.

मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.

वैद्यकीय कर्मचारी य औषधी विक्रेते यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन पास द्वारे बीड शहरांतर्गत प्रवासास परवानगी देण्यात येत आहे. सर्वांनी सामाजिक अंतर कटाक्षाने पाळावे आणि कोवीड विषयक सर्व नियमांचे पालन करावे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये
म्हणून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार संपूर्ण बीड शहरामध्ये ०८ दिवसांसाठी ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *