बीड शहरात पोलीस कर्मचार्या च्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
बीड : शहरातील धानोरा रोड परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना आज (दि.५) रोजी पहाटे उघडकीस आली.
आकाश शशांक पवार (वय २०) असे त्या तरूणाचे नाव आहे. तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आकाशचे वडील शशांक पवार हे नेकनूर ठाण्यात जमादार आहेत. आकाशने मध्यरात्री कधीतरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटेनची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.