LatestNewsबीड जिल्हा

बीड शहरातील ठराविक भाग प्रशासनाकडून सील..!

बीड : शहरातील मोमीनपुरा-अशोकनगर येथे मंगळवारी दोन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले तसेच सावतामाळी चौकात लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरातील इतर ठिकाणी कोरोनाचा प्रार्दूभाव होऊ नये म्हणून मोमीनपुरा-अशोकनगर परिसरातील गफूर इब्राहीम मिस्त्री यांच्या घरापासून बीलालभाई बर्तनवाले यांच्या घरापर्यंतचा व जयभवानीनगर,सावतामाळी चौक परिसरातील बाबुराव मारोतीराव दुधाळ यांच्या घरापासून ते कुंडलीक खांडे यांच्या घरापर्यंत कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. हा सर्व परिसर पुढील अनिश्‍चित कालावधीसाठी बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे. याबाबत बुधवारी सायंकाळी आदेश जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *