LatestNewsबीड जिल्हा

बीड शहरातील आणखी काही भागात संचारबंदी लागू ; अंबाजोगाईत दोन भाग केले सील !!

बीड : शहरातील लक्ष्मण नगर, लेंडी रोड, जुन्या पोलीस्टेशन जवळ कबाड गल्ली, कागदी दरवाजा, पोलीस कॉलनी बशीरगंज व
अंबाजोगाई शरातील बागवान गल्ली,कैकाड गल्ली (सदर बाजार) येथे केटेनमेंट झोन घोषीत करून संचारबंदी लागू केल्या बाबतचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे यांनी दिले आहेत

शहरातील लक्ष्मण नगर लेंडी रोड या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे लक्ष्मण नगर लेंडी रोड येथे वंदना गायकवाड यांच्या घरापासून नारायण घाडगे यांच्या घरापर्यंत कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे तसेच बीड शहरातील जुन्या पोलीस स्टेशन जवळ कबाड गल्ली भागातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे शगुन आर्ट शेख हारून शेख चांद यांच्या घरापर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे तर शहरातील कागदी दरवाजा याठिकाणी शेख अमीर शेख उमर यांच्या घरापासून शेख खुदबुद्दीन शेख गयासुद्दीन यांच्या घरापर्यंत चा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे त्याचबरोबर शहरातील पोलिस कॉलनी बशीर गंज या ठिकाणीदेखील बिल्डिंग क्रमांक आठ याठिकाणी कंटेनमेंट दोन घोषित करण्यात आला आहे पोलिस कॉलनी बीड शहर याबरोबरच अंबाजोगाई शहरातील बागवान गल्ली याठिकाणी कोरोनाविषाणू चा रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग देखील कंटेनमेंट घेऊन घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर अंबाजोगाई शहरातील कैकाडी गल्ली सदर बाजार हा भाग देखील संचारबंदी म्हणून घोषित करण्यात आला आहे असे आदेश अपर जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *