बीड, माजलगाव, परळी , गेवराई या शहरातील ठिकाणी आणि अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील काही गावांमध्ये कंटेनमेंट दोन घोषित

बीड, दि, २३:– बीड, माजलगाव, परळी , गेवराई या शहरातील काही ठिकाणी आणि अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाविषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे या सर्व संबंधित ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे,असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भागातील संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत यामध्ये बीड शहरात शहरातील रविवार पेठ व आदर्श नगर , अंबाजोगाई शहरातील हाउसिंग सोसायटी, परळी शहरातील हमालवाडी व हाबिब पुरा , गेवराई शहरातील राज गल्ली, गेवराई तालुक्यातील गढी हे गाव, माजलगाव तालुक्यातील लवूळ क्र. १ हे गाव आणि संबंधित परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच या सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येऊन पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाने लोक डाउन कालावधी ३१ जुलै २०२०पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै २०२० रोजी रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

56 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *