बीड पोलिसांसाठी “पोलीस covid-19” सुरक्षा सेल कवच

बीड : दिनांक 28 एप्रिल रोजी मा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोरोना “covid-19” विषाणूच्या अनुषंगाने सुरक्षात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस “covid-19” सुरक्षा सेल स्थापन करण्यात आला आहे सध्या देशात तसेच राज्यात करुणा विषाणूच्या प्रादुर्भावाचा उद्रेक सुरू आहे त्यामध्ये राज्यातील पोलिस दल आघाडीवर राहून कर्तव्य बजावत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून बीड जिल्हा दलाच्यावतीने पोलीस “covid-19” सुरक्षा स्थापन करण्यात आला असून या सेल चे प्रभारी अधिकारी म्हणून सपोनि गजानन बी. जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे
यातील च्या माध्यमातून बीड पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्याचे व शाखा चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व त्यांचे परिवाराचे ताप श्वसनास त्रास खोकला घशात खवखव व शारीरिक वेदना यांची दैनंदिन माहिती संबंधित कडून घेऊन संकलित करून त्याचा अहवाल पोलिस मा. अधीक्षक यांना दररोज सादर करण्यात येईल
बीड पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्याचे व शाखांचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्यांचे कॅन्सर, टी, बी, एच, आय, व्ही, मधुमेह, लठ्ठपणा, हायपरटेन्शन, चे औषधोपचार सुरू असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन सादर करतील व यापैकी आजार असणाऱ्यांची “covid-19” संबंधाने स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येणार आहे तसेच यातील च्या माध्यमातून ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वरीलपैकी आजार आहेत त्यांना फिल्डवर कर्तव्य दिले जाणार नाही याबाबत माहिती घेऊन पाठपुरावा व नियंत्रण करण्यात येईल
पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येणारे सुरक्षा साधने उदा. पी पी इ कीट, फेस शील्ड, मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनी टायझर, इत्यादीचे निमित वाटप यांच्या माध्यमातून केले जाणार आहे
तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्टाफ ची अनेक वतिका अधिकारी यांच्याकडून प्रत्येक आठवड्याला “covid-19” अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येणार आहे
दर आठवड्याला प्रत्येक पोलीस स्टेशन व पोलीस वाहनांचे पोलीस साहित्याचे पोलीस वसाहतीचे सोडियम हायपोक्लोराइडने निर्जंतुकीकरण केले जाण्यासाठी बारीक लक्ष ठेवून ते करून घेण्याचे व पाठवा करण्याचे काम या सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यातील मधील सेलचे प्रमुख सपोनि गजानन जाधव व पोलीस कर्मचारी स्टाफ हे वरील सर्व प्रकारचा “covid-19” अनुषंगाने सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी चा पाठपुरावा करतील

171 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *